७६३. हंगामाचा सण

मराठी

७६३. हंगामाचा सण पेरा हो सकाळी पेरा प्रितिबीज दुपारीहि पेरा संध्याकाळी हो कापणी निश्चयें, पीक प्राप्त होई आम्ही हर्षें येऊ पेंढ्या घेऊनि ... १ पेंढ्या घेऊनि, पेंढ्या घेऊनि आम्ही हर्षें येऊ पेंढ्या घेऊनि ... ध्रु सूर्याच्या तेजाने साऊली हि पेरा मोठा वारा सुटे अभ्रे पळतीं कापणी निश्चयें फळ मिळे कष्टाचें आम्ही हर्षें येऊ पेंढ्या घेऊनि ... २ स्वामीसाठीं पेरा अश्रू ढळतांना दुःख असो भारी मन कष्टती प्रभू अंगिकारी अश्रू पुसुनिया आम्ही हर्षें येऊ पेंढ्या घेऊनि ... ३ -------- डब्ल्यु . जे. रमसे