मराठी
७६४. दारूळे कुशल पाहिजेत
जगाच्या बागेंत जीवनाची मोट
मोटकरी ख्रिस्त चालवितो ... १
बाग बहरावी येथुनी तेथुनि
करितो म्हणुनी श्रम अति ... २
थारोळे तुडुंबे, खळखळती दंड
वाहती अखंड दीनांसाठी ... ३
कोणतेहि झाड न जावें जळुनी
धरी इच्छा मनीं मोटकरी ... ४
कोपरा कोपरा जगाच्या बागेचा
भिजावा तयाचा हेतू असे ... ५
वाफ्यावाफयातून न्यावया हें जल
दारूळे कुशल पाहिजेत ... ६
-------------- सो. स. ठोकळ