मराठी
७६५. राजा येशू
राजा येशू आला राजा येशू आला
सैतानाला जिंकायाला, राजा येशू आला ... ध्रु
घालवुनी पापें आणि दुःखें घोर
पूर्ण शांती द्यावयाला राजा येशू आला ... १
आनंदीं आनंद झालों पापमुक्त
मला शुद्ध करायाला, राजा येशू आला ... २
वधस्तंभावरीं प्राण देता झाला
जगताचा त्राता झाला, राजा येशू आला ... ३
राजांचा तो राजा प्रभूंचा तो प्रभू
बोला सारे जयजय बोला, राजा येशू आला ... ४
------ unknown