७६६. शारोनाचा गुलाब

मराठी

७६६. शारोनाचा गुलाब राजा असे राजांचा हा गुलाब शारोनाचा ... ध्रु स्वर्गसुख सोडिलें जगिं नीचपण घेतलें त्राता हा जगताचा, हा गुलाब शारोनाचा ... १ अंधाला डोळस केले मृतानां सजीव केलें वैद्य हा जगताचा हा गुलाब शारोनाचा ... २ भुकेल्यां अन्न दिलें तान्हेल्या तृप्त केलें कैवारी हा दीनांचा हा गुलाब शारोनाचा ... ३ चकतो अंधारात अति उंच शुभ्र शांत तारा हा पहाटेचा हा गुलाब शारोनाचा ... ४ मम हृदयिं अंधार दुर्गुणांचा बाजार प्रकाश हा जगताचा हा गुलाब शारोनाचा ... ५ मी बलहीन देवाला दे शक्ती हाचि धावा सिंह हा यहूदाचा हा गुलाब शारोनाचा ... ६ ----------- वीरसेन हिवराळे