मराठी
७६८. आई
प्रसन्न जननी नयनीं देखून
करितों वंदन तुला प्रभो ... १
प्रफुल्लित फुलें, वेलीवर फुल
मांडीवर मूल आईच्या मी ... २
प्रेमळ पाखर तियेची विमल
खचित अमोल मजवरी ... ३
प्रेम जें भासतें, भोंवतीं हासतें,
मला रंजवितें आईचें तें ... ४
प्रभू ठेव सुखी मदीय मातेला
मजहि बाळाला सर्वकाळ ... ५
------ वि. आ. बेडेकर