मराठी
७६९. ख्रिस्ती गृह कसें असावें
निर्मल मंगल सदन असावें
प्रभुरायाच्या समक्षतेने
तें विलसावें, फुलुनी जावें
नैराश्याच्या तिमिरामाजी
तेज भरावें, दीप बनवावें
पददलितातें जवळी घ्यावें
वाली बनावें, आश्रय व्हावे
सदनीं अमुच्या प्रभुजी वसतो
नच विसरावें, नच विसरावें
खरी सुवार्ता पाहून येथें
जग हरवावें, थक्क बनावें
------- स. ना. सूर्यवंशी