७७०. अंकावर लहान

मराठी

७७०. अंकावर लहान मंगल तव गुणगान, माउली, ह्या मुखें गातसे जय जय करुनि प्रेमाचे लघु गान ... ध्रु आज तुझा गे मान माउली तुज सदा देतसे, रोज ह्यापुढें ईश्वर हें वरदान तूं मम सौख्याची केवळ गे माउली, त्या सुखानंदी गे तनु माझी वाढली, मज उरीं घेऊनि पुढेंच सरसावली, मीच असें तव प्राण, माउली तव प्रेमामधुनी अंकुर आलों अंकावरती लहान ... १ नटली सृष्टी महान माउली, तुजसवें विराजे वत्सल प्रेमा दुग्धरसाचें पान तूं नवें नवें कल्पूनि मनीं तोषिलें, जग तुला निरंतर संबोधित राहिलें, मी सान बाळ गे तुझ्याच प्रेमातलें, असो तुझा अभिमान मला तो हा प्रेमरज्जुनें सुमन हार गे गुंफूनि अर्पी मान .... २ ------- गं. अ. भालेकर