७७१. आदर्श गृह

मराठी

७७१. आदर्श गृह येशुगृहीं सारे जाऊ या चला रे वंद्य मातापितारें पाहूं त्याचिं ... १ मरीया, योसेफ येशूबाळाप्रती पहा वागवितीं अत्यादरें ... २ गृहकामीं येहू करितो मदत, असे आज्ञांकित पुत्र तोहि ... ३ देवसहवास, प्रार्थनेची हौस कुटुंबांत खास वसतसे ... ४ वाटे त्या शास्त्र मोलवान ठेवा, आत्मिक हा दिवा हृदयाचा ... ५ आदर्श हें गृह दिसे नाज्रेथी पुरेपूर प्रीती तेथें वसे ... ६ आपुलिही गृहें बनवूं आदर्श प्रभू येशू हर्ष पावे त्यांत ... ७ --------- प्रियंबदा रुकडीकर