मराठी
७७२. विवाहसमयी केलेली प्रार्थना
शुभ दिन आज उदेला आयुष्यी,
वसे जो मानसीं, देवा, तुझ्या ... १
लग्नविधि बा तूं प्रेमें संस्थापीला
मार्ग दावायाला आनंदाचा ... २
करिन कृपादृष्टीं देई वरदान
जरी हीं अजाण संसाराब्धी ... ३
वधुवर होती एकमेकां युद्ध
तशींच विशुद्ध, राख सुखी ... ४
संसारनौकेचा नावाडी तूं धन्य
नसो कोणी धन्य तुजविना ... ५
सुकाणू घे हातीं संसारसागरीं
नेईं पैलतीरीं नौका यांची ... ६
फलद्रुप करी वारुनी संकटें
वाढीव रोपटें आशीर्वादें ... ७
--------- प्रियबंदा रुकडीकर