७७३. मंगलाष्टक

मराठी

७७३. मंगलाष्टक जें जें सुंदर उत्तमोत्तम जगिं सामावलेलें असें, तें तें सुंदर उत्तमोत्तम मनीं घेईं भरोनि कसें सौंदर्य अवनी फुले, मन खुलें, तें व्योम दिगमंडळ तें सौंदर्य अतां तूझ्यासह वसो, साधा तुझें मंगल ... १ आहे प्रेम म्हणून मौज गमते कांहीं तरी जीवनीं, जेथें प्रेम नसे, अहर्निश तेथें देवषाग्नी खेळे मनीं सत्प्रेमास न देवघेव तुमची प्रेमीं सदा प्रेमल तें सलोम अतां तुझ्यासह वसो, साधो तुझें मंगल ... २ भक्तिभाव बघून देवही न ये तो काय भक्ताधरीं भक्तिभावचं मोक्षसाधन असे जीवितमार्गावरी भक्ती काय न भाव भाव नसतां ते काय भक्तीबल भक्तिभाव अतां तुझ्यासह वसो, साधो तुझे मंगल ... ३ जें साधेंपण मूर्तरूप धरुनी ह्या भुतलीं पातलें, जें साधेपण तारणास्तव वधस्तंभावरीं मारिलें, जें साधेपण मृत्यू जिंकून पुन्हा स्वर्गास उंचावलें, तें साधेपणही तुझ्यासह वसो, साधो तुझें मंगल ... ४ विश्वासेंच भवाब्धिते तारुनिया सदभक्त गेले किति विश्वासेंच मिळेल तारण तुम्हां श्रीख्रिस्तउक्ति अशी विश्वासांत विरामता प्रभुपदीं लोभ शांतिजल तो विश्वास अतां तुझ्यासह वसो, साधो तुझें मंगल ... ५ आशा निरस जीवनी करीतसे माधुर्य उत्पन्न जी, स्वर्गीचें जणू नांदनोपवन हि हा भास सृष्टी खुजी भावी काळ चितारूनी मन रमे सौख्यि जयिं सोज्वळ, आशा तीच अतां तुझ्यासह वसो, साधो तुझें मंगल ... ६ जें वात्सल्य तुझ्यासवे उतरूनी स्वत्वांत सामावलें, दुःखाचा तव भारही उतरण्या सन्निध जें ठाकलें सारें आयु तुझें बनो म्हणतसे वात्सल्य जें उज्ज्वल, तें वात्सल्य अतां तुझ्यासह वसो, साधो तुझें मंगल ... ७ इंदुतेज चढे जसें, तसतसा ये सागरातें भर, दुखातांस बघूनीया तव दयासिंधूस येवो भर सत्कीर्ती तव उंच उंच पसरो व्यापूनिया भुतल, मंगलयाधिपती तुझ्यासह वसो, साधो तुझें मंगल ... ८ ----------- यशवंत दिवे