७७४. भोजनास बसलेल्यांनीं करावयाचें ईशस्तवन

मराठी

७७४. भोजनास बसलेल्यांनीं करावयाचें ईशस्तवन मला स्वजनवत्सला पुरवितोस अन्नोदका अमोघ सदयत्व हें खचित वर्णनी मी मुका शरीर मम हें झीजो तव सदैव सेवा घडो घडो प्रिय मदीय हें चरित येशूला आवडो ... १ ----- ना. वा. टिळक