मराठी
७८०. समाप्तीची प्रार्थना
श्रीख्रिस्ता, करुणाकरा, अघहरा,
विश्वंभरा, मंगला
त्वंत्सेवा करण्यांस ज्ञान बल दे,
हें प्रार्थितों प्रेमला
जावो नांव दिगंतरीं तव गुरो,
होवो तुझा गौरव,
व्हावें लीन तुझ्या पदीं प्रभूवरा,
हें आमुचें वैभव
---------- स. आ. पाठक