७८२. संस्थेचा वाढदिवस

मराठी

७८२. संस्थेचा वाढदिवस तूंच उभारलीमी, तूंच चालविली संस्था हि आपुली, देवबापा ... १ उपकार झाले, किती आजवरी तुझें आम्हावरी न वर्णवे ... २ तुज आवडे तया, कार्यामाजी यश तूंच या देतोस, ठावें झालें ... ३ तरी तुज अंतीं, करितों विनंती अखंडित प्रीति, तुझी लाभो ... ४ ----- सो. स. ठोकळ