मराठी
७८५. नव्या वर्षाची पहाट
निशा संपली, उषा हासली,
दिशा पूर्व प्रसवली
नवें हें वर्ष बाळ भूवरीं
विविध रंग तारांगण
विविधने अंबर शृंगारिलें
पितांबर गुढ्या तोरणीं डुलें
विहंग गाणी दंग जहाले
रंग उमटला नवा
गिरीच्या शिखरीं वृक्षपल्लवां
हि सृष्टी आली नवं हरित वसन लेउनी
नवं दिशा नव्यानें सजल्या सुवासिनी
चित्रकार सागर प्रतिबिंबा रेखुनी
संथजलपाटावरी बैसला,
अवनी सकल उजळली
पर्व हि नवं वर्षा प्रसवली ... १
वर्षामागून वर्षें जाती रोज दिवस तेधवां
उगवतां भानू कोमल नवा
काळ वेळ विक्राळ उन्हाळा
माध्यान्हीं तळपतो
सकलां दग्ध करीं तापतो
ताप शमवि आमाप सर्वता
जातां क्षितिजांतलीं
जसे जण वृद्ध देवपावली
ह्या भरतीं ओहटी जन्म मरण राहटीं
हें विश्व् बसोनि मोजी पळपळ घटी
कालाच्या कधीं सांपडे, न जाणें, मिठीं
सावध व्हा नव जन्मा पावा, वेळ आज लाभली,
पूर्व हि नव वर्षा प्रसवली ... २
----- स. ना. देठे