मराठी
७८५ . नवें वर्ष
गत सालाहून अधिक माधुरी
आण आपुल्या उच्चारी
प्रभूला थोडें प्रार्थि अधिकतर,
अधिक मानवी प्रेम करी
देवपित्याच्या तूं प्रेमाला बिलग,
अधिकतर मग नाहीं
तव इहजीवीत होईल बा रे,
दिव्य जिवीतासम पाहीं.
---------- सु. ना. थोरात
मराठी