७८६. मुलांच्या निजण्यापूर्वीची प्रार्थना

मराठी

७८६. मुलांच्या निजण्यापूर्वीची प्रार्थना निजण्याची झाली वेळा सांभाळी मज वेल्हाळा ... ध्रु दिवसां मज तूं सांभाळियलें अन्न व पाणी मजला दिधलें दुःख त्रास यां दूर सारिलें धरिलें हृदयिं बाळा ... १ बाबा, आई, ताई, माई, भाउ तसे हें प्रेमल पाहीं तव उपकारां सीमा नाहीं धरिसी हृदयी बाळा ... २ विचारकरणीं शब्द ययांही नावडतें मीं केलें, कांही करीं क्षमा मज गा लवलाहीं दूर करीं नच बाळा ... ३ सर्वांवरी मम प्रेमा राहो भावंडें भवतीं, हो भावो येशू सखा मम सदैव होवो विनंती हि जगपाळा ... ४ रात्री मजला संभाळावें निद्रा विश्रांतीला द्यावें रात्र संपतां मज उठवावें धरुनी हृदयिं बाळा ... ५ ------ सु. ना. थोरात