मराठी
७८७. मी हि मम नाहीं उरलें
घे मम आयु हें सारें,
अर्पित पदीं तुझिया प्रभू रे
घे निमिषें घे दिन अवघे,
तुझ्या वाहू दे स्तुतीसंगे ... १
घे कर दोन्ही प्रभुराया,
प्रितीने भर तया तुझिया
दुर्बल पद जरी हें देवा,
धांवु दे त्यां घे सेवा ... २
कंठ घेई हा,
गाईन मी केवळ तुजसाठीं स्वामी
अधर गुरो घे,
त्यांकरवी वचनसुधा तव जगिं व्हावी ... ३
घे धन सारें प्रभू तुजशीं,
नुरो कपर्दिक मजपाशीं
चित्त, बुद्धी, बळ ज्या नांवे,
घे उचलुनी तुज जें व्हावें ... ४
इप्सित माझें घे,
आतां तुझीच रे त्यावर सत्ता
केलें बघ हें हृदय रितें,
होवो तव सिंहासन तें ... ५
घे मतप्रीति मम जीव,
तुझे पाय मज सर्वस्व
कण कण ख्रिस्ता तव झालें,
मी हि मम नाहीं उरलें ... ६
------------------ अ. दे. टिळक