७८८. जगाचा प्रकाश येशू

मराठी

७८८. जगाचा प्रकाश येशू पापंधकारांत हें जग असे, जगाचा प्रकाश येशू हा सूर्य खरोखर आला आहे, जगाचा प्रकाश येशू ... १ तो म्हणे ये, तेजाकडे ये, तुझ्यासाठि आमंत्रण हें, आंधळ्याला आतां दिसतें ... ध्रु येशूच्या शेजारीं अंधार नसे, जगाचा प्रकाश येशू मागें येणाऱ्यांस उजेड मिळे, जगाचा प्रकाश येशू ... २ अहो आंधळ्यांनो, अहो पाप्यानो, जगाचा प्रकाश येशू तयाचें ऐकुनी धुवा हो धुवा, जगाचा प्रकाश येशू ... ३ स्वर्गीय गृहाचा प्रकाश कसा स्वर्गाचा प्रकाश येशू तेथील तो दीप पहा कोकरा, स्वर्गाचा प्रकाश येशू ... ४ ---- पी. पी. ब्लिस