७८९. तेजोनिधें दयाळा

मराठी

७८९. तेजोनिधें दयाळा वेढून टाकिताहे औदास्य भोवतालीं गृह दूर राहिलेलें घनघोर रात्र काळी तेजोनिधें दयाळा दाखिव मार्ग मातें जावोत ना पडेन हीं सोडूं सत्पथातें. मी दूरचिंच दृष्ये पाहावया न वानछी भूमी पुढें दिसावी एकाच पाउलाची नव्हती तुझ्याअ कृपेची जाणीव आजवेरी पथ कोणता धरावा, हेंहि न मी विचारीं असतां प्रभा दिनाची चित्तास रंजवाया, होतें अहंपणाचें अधिराज्य मानसीं या आप्रि सर्व मागचे हें अपराध विस्मरोनि, तिमीरांत या कृपाळा दे मार्ग दाखवोनि होतां तुझ्या कृपेची वृष्टी घनांधकारी सरिता, गिरी , वनें हीं होतील लंघ्य सारीं व्योमीं प्रभा उवेची पसरेल आणि अंती दिसतील हसतांना स्वर्गीय आनन ती ------ गोपीनाथ तळवलकर