७९०. शांतीचा राजा

मराठी

७९०. शांतीचा राजा शांत काळ दिव्य बाळ भीषण अंधकार गव्हाणींत येशूबाळ, शोभवी जगा तेजाळ घे विश्रांती शांत, शांतीचा राजा प्रशांत ... १ शांत काळ दिव्य बाळ अंधकार प्रकाशांत दूर होईं, त्या क्षणांत, दूत येति आनंदांत हालेलूया गात शांतीचा राजा प्रशांत ... २ शांत काळ दिव्य बाळ पृथ्वी स्वर्ग आनंदांत दिव्यदूत गाणी गात, जाउनी तै मेंढपाळ ख्रिस्त वंदिला, शांतीचा राजा प्रशांत ... ३ शांत काळ दिव्य बाळ बेथलेहेमी येशू बाळ मागी लोक वाहुनी, अर्पणे तया चरणीं भेटती नृपास, शांतीचा राजा प्रशांत ... ४ शांत काळ दिव्य बाळ यो प्रकाश मन्मनांत दिव्य गाणी गाऊं या, येशूराज वानू या हालेलूया गात शांतीचा राजा प्रशांत ... ५ ------ सु. धों. रामटेके