७९२. स्तोत्र पहिलें

मराठी

७९२. स्तोत्र पहिलें धन्य तो पुरुष नच चाले कदा दुर्जनांच्या मतां आयकोनी ... १ पातकी जनांच्या मार्गी नच घाली पद कधी काली चुकोनिया ... २ सहज कधीहि वसे न कोणत्या धर्मनिंदकांच्या बैठकींत ... ३ रमतो सदाही पवित्र शास्त्रांत ध्यान अहोरात्र शास्त्राचेंच ... ४ लावलेले झाड प्रवाहीं पाण्याचें फळ हंगामाचें सदा देई ... ५ पण ज्याचें कधीं कोमतच नाहीं तयासम होई तो पुरुष ... ६ आणि हातीं घेई तो जें सर्व कांही सिद्धीस तें जाई सहजच ... ७ नाहींत तयाच्या सम ते दुर्जन भुसाच्या समान उडणारे ... ८ यामुळेंच न्यायकाळीं ते दुर्जन टिकती कदा न जाणा तुम्ही ... ९ उभे न राहाती धार्मिक जनांच्या मंडळींत साच्या पापी जन ... १० धार्मिकांचा आयुक्रमचं कारण अवगत जाण ईश्वराला ... ११ तसा दुर्जनांचा आयुकर्म नष्ट होतोची प्रचित पाहोनि घ्या ... १२ ----- शा. निर्मळ