मराठी
७९३. ईश्वरावर अढळ श्रद्धा
प्रकाशतारण यहोवा अम्हाला कांहीं ना कमती
कशाची आम्हांला भीती, जीवनाधार यहोवा ... ध्रु
सैन्याचा पडला वेढा, अरी जरी मारण्या आला
तरी विश्वास आम्हाला जीवनाधार यहोवा ... १
यहोवा प्रार्थितों तुजला, दे ज्ञान शोधण्या तुजला
रमवि पायिं आम्हाला, जीवनाधार यहोवा ... २
विजयी करोनि आम्हाला करी विस्मित शत्रूला
सानंदें स्तवितो तुजला, जीवनाधार यहोवा ... ३
दयाळा विनवीं तुजला, दे उत्तर बाळाला
घडु दे दर्शन आम्हालां जीवनाधार यहोवा ... ४
मातापित्यांनी सोडिले, करीं न कोपें तुंही दूर
तारणदुर्गा आम्हां तरीं, जीवनाधार यहोवा ... ५
तूझ्या इच्छे चालवी मार्गीं धरोनी आम्हालां हातीं
वैरी अम्हां भेडाविती, जीवनाधार यहोवा ... ६
समक्षता तुझी बघण्या, देशी बळ धीर आम्हालां
हृदीं हा भाव राखीला,जीवनाधार यहोवा ... ७
------ खु. शां. घोरपडे