७९५. स्तोत्र १२१

मराठी

७९५. स्तोत्र १२१ पर्वताकडे मी दृष्टी लावू काय कोठून सहाय येतें माझें ... १ आकाश पृथ्वीचा उत्पन्न करिता तोच माझा त्राता साह्यकारी ... २ पाय तव नाहीं सरकू देणार तव राखणार निद्रा न घे ... ३ इस्राएला रक्षी, नाही तो नीजत नाहीं झोपीं जात कधीं मुळी ... ४ ईश्वर रक्षक तव सत्य असे तोच कीं विलसे सघ्य करीं ... ५ उजव्या हाताशीं तुझा परमेश छाया असे खास तोच तुझी ... ६ दिवसाचा सूर्य चंद्र तो रात्रीचा नाहीं पिडायाचा तुला कधीं ... ७ अरिष्टापासून ईश्वर राखील जीव संरक्षील तव सत्य ... ८ बाहेर कीं आंत तव जाणें येणें तुजला राखणें देवा हाती ... ९ ------- मी. वि. तर्खड _