मराठी
७९६. स्तोत्र १३१
प्रभो माझें मन क्रोधें न तापलें
धुंद न जाहले नेत्र कधीं ... १
शक्यतेची कोटी सोडूनि न कधीं
चमत्कारामधीं शिरलो मी ... २
साळसूद मूळ राही जेवीं शांत
तेवी केलें चित्त स्थिर देवा ... ३
रवी, शशि, तारे आहेत तोंवरि
प्रभुकृपेवरी विसंबावें ... ४
------ गोपीनाथ तळवलकर