७९७. जात्यावरच्या ओव्या

मराठी

७९७. जात्यावरच्या ओव्या पहिली माझी ओवी नाहीं गाण्याचा आळस तारक येशू ख्रिस्त माझ्या जिन्याचा कळस ... १ तारक येशू ख्रिस्त नाहीं वसत देव्हाईरी माझ्या ग मनामधे त्यांचं देऊळ तें भारी ... २ आईतवार दिस मला येडीला ठावं नाहीं मार्याबाई बोले कां ग भक्तीला आली नाहीं ... ३ देवळाच्या पुढं गार सावली चंदनाची दयाळू प्रभुईची पेटी वाजती गायनाची ... ४ दुसरीं शास्त्र नको माझं बायबल चांगलं प्रभूच्या वचनात माझं मन ग रंगईल ... ५ जेवण जेवितांना नाहीं प्रार्थना मी ग केली परी ग पंगतीला येशू , मार्याबाई आली ... ६ किती ग वाट पाहुं झालीं नेत्र माझी कष्टी तारक प्रभू माझा कधीं पडे माझ्या दृष्टी ... ७ दळण संपविलं पीठ भरून ठेवियेल प्रभूंचं गोड नांव माझ्या हृदयिं साठविलं ... ८ ------- सखुबाई भिकू गायकवाड