मराठी
७९८. सद्गुणी स्त्री
चांगली सद्गुणी स्त्री कुणा प्राप्त होते ग
मोल तिचे मोत्याहूनी अधिकची होतें ग ... ध्रु
तियेच्या पतीचा मान अखंड धरिते ग
संपत्तीची वान त्याला मुळीं न पडते ग ... १
ताग लोकरीचा माल दुरून आणिते ग
कापूनि पिंजूनी वस्तू तयार करिते ग ... २
गलबतासमान ती व्यापार करिते ग
उद्योगांत बाई कशी गुंतून रहाते ग ... ३
मोठ्या पहाटे उठून उद्योगा लागते ग
कुटुंबाचें अन्नपाणि तयार करिते ग ... ४
आपुल्या दासीला वांटा अन्नाचा ती देते ग
निजवत्सासम तिची निगा ती राखिते ग ... ५
------------ unknown