२. इवलासा पोर मारियेचा देखणा

मराठी

२. इवलासा पोर मारियेचा देखणा इवलासा पोर मारियेचा देखणा मोठा धूर्त शहाणा हा बाळ गुणी आवडे ना कुणा ... ध्रु शास्त्री पंडितांच्या मंदिरात लगे पैजा धिटाईने होता उभा बाळ त्यात माझा थक्क झाले थोर हो हो हो ... थक्क झाले थोर ऐकुनी त्या भाषणा मोठा धूर्त शहाणा हा बाळ गुणी आवडे ना कुणा ... १ विद्वानाने टाकियेले नानाविध कोडे... (२) बिनचूक संगे बाळ बोल जरी बोबडे ... (2) शुभ्र वस्त्र धरी हो हो हो sss... शुभ्र वस्त्र धरी पवित्रेच्या त्या खुणा मोठा धूर्त शहाणा हा बाळ गुणी आवडे ना कुणा ... २ दास म्हणे ख्रिस्ता अंगी किती तत्वज्ञान ... (2) बालपणी दिसण्यात देवाजीचे दान ... (2) नको करू मानवा हो हो हो sss ... नको करू मानवा सुज्ञान घोषणा मोठा धूर्त शहाणा हा बाळ गुणी आवडे ना कुणा ... ३