मराठी
६. अनमोल या प्रीतीला
अनमोल या प्रीतीला
कवटाळुनी धरावे
प्रीती तुझी स्मरावी
हृदयात साठवावी ... ध्रु
देवाने या जगावर
अनमोल केली प्रीती
धाडीला पुत्र जगती
जोडावयास नाती
प्रभू येशू च्या प्रीतीची ... (२)
आठवण सदा करावी
प्रीती तुझी स्मरावी
हृदयात साठवावी ... १
प्रभू येशूच्या प्रमाणं
वधस्तंभ हे निशाण
आम्हा पापियांच्यासाठी
दिला क्रुसावरी प्राण
राजाचा रंक झाला ... (२)
पाप्या क्षमा मिळाली
प्रीती तुझी स्मरावी
हृदयात साठवावी ... २