मराठी
७. रस्त्यावरती दोन आंधळे
रस्त्यावरती दोन आंधळे
प्रभू येशूला मागती डोळे
करी विनंती प्रभूला म्हणती ...(२)
हे दाविदाच्या मुला sss ...
करी आम्हावरी दया ... ध्रु
प्रभू येशू हा चालता पुढे
कष्टी जनता मागे पडे
करी विनंती प्रभूला म्हणती ...(२)
हे दाविदाच्या मुला sss ...
करी आम्हावरी दया ... १
आंधळ्यांना प्रभू दृष्टी देता
पांगले ते पळू लागता
केली विनंती आंधळे म्हणती ...(२)
हे दाविदाच्या मुला sss ...
केली आम्हावरी दया ... २