८. स्पर्श त्याने मला मात्र केला

मराठी

८. स्पर्श त्याने मला मात्र केला स्पर्श त्याने मला मात्र केला त्याच वेळी महारोग गेला ... ध्रु बोलला तो तिथे मंत्र नाहीं ...(२) लाविले अवषधाला न काहीं दिव्य स्पर्शास व्याधी हि भ्याल्या त्याच वेळी महारोग गेला ... १ बोललो मीच त्या ख्रिस्तराया ... (२) शकतं आहेस व्याधी हराया त्यास विश्वास माझा कळाला त्याच वेळी महारोग गेला ... २ जे घडे ते न कोनानिवेदि ... (२) देव बोले तयाला प्रसिद्धी सत्य केव्हा तरी ये मुखाला त्याच वेळी महारोग गेला ... ३