मराठी
१०. हुकूम फिरविला राज्याने
हुकूम फिरविला राज्याने
ज्याने त्याने आपुली नावे
दाखल करण्यास यावे सारें ...ध्रु
मार्या योसेफ दोघे मिळोनि
जात असता बेथलहेमी ... (२)
उतार शाळेत जागा नाही हो
उतार शाळेत जागा नाही
त्रास तिला होई
गाई गोठ्यात जाऊन राही ... १
तो सुदिनं मावळता
मध्यरात्री बारा वाजता
मार्या मार्था गृह वीण असता हो
मार्या मार्था गृह वीण असता
त्यात तिला होई
गाई गोठ्यात जाऊन राही ... २