११. दिले प्रभूने शास्त्रामधुनी

मराठी

११. दिले प्रभूने शास्त्रामधुनी दिले प्रभूने शास्त्रामधुनी वचन तयाचे स्मर मानवा ...(२) प्रीती शेजाऱ्यावर कर प्रीती प्रीती शेजाऱ्यावर कर ... ध्रु वैरी शब्द हा ठेऊ नको मनी पाहू नको त्या तुच्छ नजरेनि पाप पुण्य हे तुलाच ठावे येऊनि ख्रिस्ता स्मर .... १ प्रतिबिंब हे आरशातले अनुभव सारे जीवनातले उंच हवेल्या महालमाङया कोसळतीभूवर मानवा ... २ सर्वश्रेष्ठ ही प्रीती ठरली ओस सागरा व्यापून उरली प्रीती म्हणावी ती मोहरी इतकी ठेउनी ख्रिस्ता अमर मानवा ... ३