१3. नाद मृदूंगाचा टाळ्यांचा गजर

मराठी

१3. नाद मृदूंगाचा टाळ्यांचा गजर नाद मृदूंगाचा टाळ्यांचा गजर येशूच्या पदाला भिडली नजर येशूच्या पदाला भिडली नजर ... ध्रु भक्तीची नशा हि गुलाबी जहाली गुलाबी नशेला कशी जाग आली प्रभू गुण गाया ... (२) जिवा हूर हुरं येशूच्या पदाला भिडली नजर ... १ सौंसारात देवा सुख दुःख आहे परंतु जीवाला तुझा ध्यास आहे रंगती भजनी सूर हे मधुर येशूच्या पदाला भिडली नजर ... २ निजलेल्या मनाला अली आज जाग स्वरांचा आवाज दावी अनुराग प्रभू दर्शनाला ... (२) जीव हा आतुर येशूच्या पदाला भिडली नजर ... ३