मराठी
१४. जिने माझे घडविले
जिने माझे घडविले जीवन सुखाचे
हृदयात या रूप त्या माउलीचे ... ध्रु
बाळासाठी चारा पाणी
चोचीत धरुनी
वाढविते ती पिल्लांना
अपेक्षा करोनि
पक्षिणी ती माझी आई ...(२)
पाखरू मी तिचे
हृदयात या रूप त्या माउलीचे ... १
अंतःकरणाच्या आत
आहे एक खोली
प्रतिमा आईची माझ्या
त्यात कोरलेली
मर्या मार्था बाई नाव ... (२)
शोभे तिचे
हृदयात या रूप त्या माउलीचे ... २