१५. योग्य मी नाही पुत्र म्हणविण्या

मराठी

१५. योग्य मी नाही पुत्र म्हणविण्या योग्य मी नाही पुत्र म्हणविण्या नोकर म्हणुनी ठेव, व मजला नोकर म्हणुनी ठेव ... ध्रु उधळ्या पुत्र पस्तावला स्वछंदाचा अनुभव आला डुकरे चारीत विचार केला नसे कपडा त्याच्या अंगाला नोकर म्हणुनी ठेव ... १ संधी दिधली मज पाप्याला पश्चाताप करावयाला नित्य पहातो माझीच वाट नच सोडी मी दुष्टपणाला नोकर म्हणुनी ठेव ... २