मराठी
१९. कुऱ्हाडी खिळे प्रभू हातीपायी
कुऱ्हाडी खिळे प्रभू हातीपायी
अमूल्य रक्त घळाघळा वाही
मार्था राडे धाई धाई ... ध्रु
प्रत्येक क्षणी प्रभू कळवळे,
जीव तळमळे आम्हा पाप्यामुळे
प्राण माऊलीचा व्याकुळ होई होई ... १
आमच्या पापापायी प्रभू दुःख साही
मातेचे हृदय कासावीस होई
क्लेश भयंकर नेत्रांनी पाही पाही ... २
गाय वासराची जशी ताटातूट होई
तशी ख्रिस्त मातेची ताटातूट होई
हंबरडा फोडून म्हणे आई आई ... ३
दुःख वेदनाने व्याकुळ होई
घायाळ पुत्र मातेकडे पाही
योहान तुझा पुत्र शोक करू नको बाई ... ४