२४. तू त्यागमूर्त ख्रिस्ता

मराठी

२४. तू त्यागमूर्त ख्रिस्ता तू त्यागमूर्त ख्रिस्ता, आम्ही बेईमान सारे आपुल्या शिरी आघातें , तू घेतलेस भारे .. ध्रु तू खांब वाहुनिया, टाकियेले उसासे, सोशियलेस कैसे, तू दुःख सारे ऐसे, तू दाविलीस पतिता, आपुला पथ मला रे ... १ हाती खिळे कुऱ्हाडी, पायात खोल शिरले, तैसा कुशीत भाला, रक्ते शरीर न्हाले, दीधलास तारणाचा, आम्हास तू झरा रे ... २ तू आंब प्राशुनीया, वदलीस गोड वाणी, फटक्यांचा आवाज ऐसा, पडला जणांच्या काणी सुख शांती प्रीती याची, केलीस द्वारे खुली ... ३