मराठी
२६. कोणी नसे कुणाचा
कोणी नसे कुणाचा, बंधू सखा रे आपुला ... ध्रु
चाल रे जिवा ती आता, दोघे मिळोनि जाऊ
ना सोबती न साथी, आई न बाप भाऊ
सुख दुःख आयुष्याचे, कांठावयासी तुजला
खोटे हे सर्व नाते, प्रभू एकटाची आपुला ... १
कैसा करू भरोसा, ह्या आप्त मंडळीचा
सर्व सुखाचे साथी, कोणी नसे दुःखाचा
येताति संकटें हीं, सोडिती साथ आपुला
खोटे हे सर्व नाते, प्रभू एकटाची आपुला ... २
भ्रम हा तुझा रे जिवा, झाला कसा कळेना
परके हे सारे वेड्या, म्हणशी आपुले ज्यांना
आभास हा सुखाचा, निर्माण तूच केला
व्यर्थ हे सर्व नाते, प्रभू एकटाची आपुला ... ३
देवा मला दे आता, तव हात आसऱ्याचा
सोडू नको रे मजला, आधार तूच माझा
तू घातलेस जन्मी, लावी आता तीराला
खोटे हे सगळे नाते, प्रभू एकटाची आपुला ... ४