मराठी
२७. सुंदर देऊळ हृदय हे माझे
सुंदर देऊळ हृदय हे माझे
येथेच विराजे, येथेच विराजे,
देवबाप, सुंदर देऊळ ... ध्रु
समक्षता त्याची राखी शुद्ध याला
सदा अशुद्धाला दूर ठेवी
सुंदर देऊळ ... १
दास म्हणे येथे, अवघी मंडळी
भजाया जमली देवबापा
सुंदर देऊळ ... २