२८. जयाचें झाले पुनरुत्थान

मराठी

२८. जयाचें झाले पुनरुत्थान जयाचें झाले पुनरुत्थान, येशुख्रिस्त भगवान अमुचा येशू ख्रिस्त भगवान ... ध्रु पाप जगाचे घेऊनि शिरी अर्पूनि प्राणा जगता तारी जगतासाठी स्तंभी चढला पाप जगाचे घेऊनि गेला मरणावरती विजयी जाहाला कोण असा बलवान येशूख्रिस्त भगवान अमुचा येशुख्रिस्त भगवान ... १ पाषाणांच्या ठिकऱ्या झाल्या चहुबाजूनी विजा चमकल्या भूमी हादरूनी थडी उघडल्या कडकडले असमान येशूख्रिस्त भगवान अमुचा येशुख्रिस्त भगवान ... २