२9. तारणारा तो जन्मला आहे

मराठी

२9. तारणारा तो जन्मला आहे तारणारा तो जन्मला आहे,\n तारणारा तो जन्मला आहे ... ध्रु\n\n आज अंबरी असंख्य तारे\n लखलखती आहेत सारे \n आज नवखा तो पूर्वेला आहे \n तारणारा तो जन्मला आहे ... १\n\n आज गव्हाणीच्या हो दारी \n मेंढपाळांचे कळप हो भारी \n मागी लोकांचा काफिला आहे\n तारणारा तो जन्मला आहे ... २\n\n चुंबण्यास धरतीच्या ओठी \n येशू बाळास पांघरण्यासाठी \n स्वर्ग किंचित वाकला आहे \n तारणारा तो जन्मला आहे ... ३\n\n\n