३१. मरुनी लाजाराला चार हो दिन झाले

मराठी

३१. मरुनी लाजाराला चार हो दिन झाले मरुनी लाजाराला चार हो दिन झाले...ध्रु एकुलता एक बंधू अमुचा भारी गुणाचा मित्र तुमचा बहू लाडाचा तुकडा जीवाचा होता आधार त्या दो बहिणींचा अवचित तवचीत काळाने त्यास लावूनी नेले मरुनी लाजाराला चार हो दिन झाले ... १ जरका तुम्ही येथे असता बंधू अमुचा मेला नसता कबरे जावळी का हो जाता सुटली असेल त्या दुर्गंधी आता मार्या आणि मार्था मार्या जा प्रभो ख्रिस्तासहे मरुनी लाजाराला चार हो दिन झाले ... २ यास्तव बाई स्थिर राही पुनरुत्थान व, जीवन पाई, विश्वास ठेवुनी स्थिर राही उठेल तुमचा बंधू त्या समयी प्रभुनी प्रभुनी त्या लाजाराला मरणातुनी उठविले मरुनी लाजाराला चार हो दिन झाले ... ३