मराठी
३२. झालं सुनं माझं घर
झालं सुनं माझं घर
माझ्या आईविना सार
कुठे शोधू ग आई तुला
भेटशील का कधी या मना ... ध्रु
आठवीत आई तुझे प्रेम हे महान
कासावीस होते आमुचे मन
आई विनण्यात का ग या मना
भेटशील का कधी या मना ... १
कष्ट करुनि आम्हा वाढविले
लहानाचे मोठे तूच ग केले
कसा विसरू ग आई तुला
भेटशील का कधी या मना ...२
देव रुपी आई माझी अदृश्य झाली
देवा घरी गेली पहा देवाघरी गेली
कसा विसरू ग आई तुला
भेटशील का कधी या मना ... ३