मराठी
३३. आई मला सोडून गेलीस आई
आई आई ग मला सोडून गेलीस आई
आई मला सोडून गेलीस आई ... ध्रु
नऊ महिने मी उदरी असता उदरी असता
तेथून पुढती जन्मा येता जन्मा येता
लय दुःख भोगले आई आई आई
ग मला सोडून गेलीस आई ... १
बालपणी तू दूध पाजोनि
तेथून पुढती झोळी हलवुनी
कंटाळा केला नाही
ग मला सोडून गेलीस आई ... २
बालपणी मी लाता मारिल्या
आनंदाने आई सहन तू केल्या
आठवण होते आई आई आई
ग मला सोडून गेलीस आई ... ३