मराठी
३४. पहाट झाल्यावरी पहाट झाल्यावरी
पहाट झाल्यावरी पहाट झाल्यावरी,
शोधूनि शोधूनि थकले भारी पहाट झाल्यावरी
पहाट झाल्यावरी पहाट झाल्यावरी ... ध्रु
करून आले सर्व तैयारी
ध्यास लागला तुला अंतरी
कोठे प्रभो कोणी सांगा तरी
शांत जिवा या कोण करी
पहाट झाल्यावरी ... १
धावत आले मी अनवाणी
तुजसाठी मी दीनवाणी
जाऊ कुठे मी अधांतरी
कोसू कुणाला या प्रहरी
पहाट झाल्यावरी ... २
देव दूतांचे वचन खरे का
घेवूनी गेले कुणी दुसरे का
परतुनी पाहे माघारी
निज भक्तांचा कैवारी
पहाट झाल्यावरी ... ३