३५. तुझ्या हाताने स्पर्श तू कर

मराठी

३५. तुझ्या हाताने स्पर्श तू कर तुझ्या हाताने स्पर्श तू कर आशीर्वादाने भरू दे हे घर ... ध्रु जे मी कमविले आणि साठविले तुझ्या दयेने ते राखिले कृपादृष्टी तुझी असू दे आम्हावर ... १ तुझ्या दयेचा मी रे भुकेला मार्ग दे प्रभू मज पतिताला सुखी राहू दे हा परिवार ... २ माझ्यावर आहे संकटाची लाट फिरवू नको प्रभू माझ्याकडे पाठ हीच प्रार्थना तूच स्वीकार ... ३