३६. आईने माझ्यासाठी जीवन जाळिले

मराठी

३६. आईने माझ्यासाठी जीवन जाळिले आईने माझ्यासाठी जीवन जाळिले मला ते नाही कधी कळले ... ध्रु जगाचा मोह लागला मजला विसरुनी गेलो आई मी तुजला आईने जग मला दाखविले ... १ कर्तव्याचे भान मी ग विसरलो वैभवात आईचे हृदय कोठे आईचे हृदय मी तुडविले ... २ सोडूनि गेली देवाच्या दारी इच्छा अपेक्षा बालगुणी उरी आईचे हृदय कधी हसले ... ३