३७. काय जीवाचा भरवसा देऊ

मराठी

३७. काय जीवाचा भरवसा देऊ काय जीवाचा भरवसा देऊ इवलासा जीव माझा, सांगा कुठे ठेऊ ... ध्रु जगामध्ये आम्ही पुढे सरकलो देवाचे घर हे मागे विसरलो देह मातीचा आत्मा देवाचा आता कसा आडवु ... १ सोडूनि जायाचे सर्व नाती काय आहे मनुष्याच्या हाती नाममात्र तुझी रे कीर्ती कुठवर मी गाजवू ... २ जगामध्ये आलो हसवुनी आलो जगातुनी चाललो रडवुनी चाललो हाका मारिल्या तुम्ही रे किती आवाज कसा मी देऊ ... ३