मराठी
३८. परमेश्वराच्या प्रेमा इतके
परमेश्वराच्या प्रेमा इतके
महान जे असते
आईचे प्रेम असे असते ... ध्रु
स्त्री जेव्हा आई होते
रूप तिचे तिथे बदलते
व्यथा मनाच्या उरात ठेवून
सदैव ती हसते
आईचे प्रेम असे असते ... १
बाळासाठी झिजते कण कण
दुःख सहाते ती रात्रंदिन
क्षणीक पत्नी माता आणि ती
चिरकालीन होते
आईचे प्रेम असे असते ... २
स्वर्गी प्रीती परमेश्वराची
तशी या धर्ती, वर आईची
तिचेच केवळ प्रेम जोडी ते
स्वर्गाशीं नाते
आईचे प्रेम असे असते ... ३