मराठी
४०. त्यागिलेस का देवा मजला
त्यागिलेस का देवा मजला
तोडिलेस का नाते अपुले
ख्रिस्त प्रभू वदले ... ध्रु
मृत्यू ला नाच प्रभुजी भ्याले
एकच हृदयी दुःख दाटले
देवापासुनी झाले वेगळे
काळीज गहिवरले ... १
चौथा शब्द वदला वदनी
रुद्र आरोळी केविलवाणी
शब्द तयाचा येता अधुरा
आश्रू भरून आले ... २
परमेशाची दृष्टी त्यावरी
त्या मर्जी सम घडले भूवरी
कंपित झाली ऐकुनी धरणी
काय असे घडले ... ३